प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

धारदार शस्त्राने वार करून युवकास जखमी करण्यात आले. ही घटना तालुक्याच्या निंबा गावात 13 डिसेंबर रोजी घडली. प्रवीण बारस्कर असे मारहाण करणा-या युवकाचे तर रोशन गिरी (24) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

समुद्रपूर (Samudrapur).  धारदार शस्त्राने वार करून युवकास जखमी करण्यात आले. ही घटना तालुक्याच्या निंबा गावात 13 डिसेंबर रोजी घडली. प्रवीण बारस्कर असे मारहाण करणा-या युवकाचे तर रोशन गिरी (24) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

तालुक्याच्या लोणार येथील रोशन गिरी याचा मित्र प्रवीण आवारी याचे लग्न जुळल्याने ते निंबा गावातील प्रवीण बारस्कर यांचेकडे गेले होते. त्यांनी डेकोरेशनचा खर्च 7 हजार रूपये सांगितला. यामुळे लोणार गावातीलच चिंटु कोल्हे यांस 5 हजार रूपयांत डेकोरेशन सांगण्यात आले. 13 डिसेंबर रोजी रोशन गिरी, गणेश गिरी व विनोद पुरी महाप्रसाद असल्याने निंबा गावात गेले होते. यावेळी प्रवीण बारस्कर याने मला डेकोरेशनचा कंत्राट का दिला नाही? या कारणावरून वाद घातला. यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यास जखमी केले. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.