शहरात उडाली एकच धांदल; पोलिसांचे दुकाने बंद करण्याचे आवाहन

मानोरा शहरात नेहमीप्रमाणे आज सुद्धा सकाळी शाहरातील सर्वच दुकाने उघड़ली होती. मात्र,कोरोनाची नवीन नियमावली लागू करण्यात आल्याने आणि ती लोकांना समजली नसल्याने शहरात एकच गोंधळ उडाला.

    मानोरा (Manora).  शहरात नेहमीप्रमाणे आज सुद्धा सकाळी शाहरातील सर्वच दुकाने उघड़ली होती. मात्र,कोरोनाची नवीन नियमावली लागू करण्यात आल्याने आणि ती लोकांना समजली नसल्याने शहरात एकच गोंधळ उडाला. सकाळी 11.15 वाजता मानोरा पोलिसांनी चौकात फिरून जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तेंव्हा इतर दुकाने बंद करण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे नागरिकात एकच गोंधळ होऊन नेमके काय झाले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

    जिल्हाधिका-यांनी सोमवारी रात्री ८ वाजता नवीन नियमांचे आदेश लागू करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. मंगळवारी सविस्तर माहिती मिळाली, परंतु दुकानदाराना ही माहिती मिळाली नाही. तर, मानोरा येथील प्रशासनाने कोणत्याही सूचना न दिल्यामुळे व्यापा-यांची एकच धांदल उडाली. अनेक व्यापारी संभ्रमात पडले होते. या गोंधळामुळे व्यापा-यांनी सकाळी दुकाने उघडली. नंतर ही दुकाने बंद करण्यात आली.

    प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक लघू व्यवसाईकांचे नुकसान झाले. यामध्ये प्रशासनाने आधीच बंदचे आवाहन केले असते तर,ज्या दुकानदाराने माल विकत घेतला तो त्यांनी घेतला नसता अचानक बंद करण्यात आलेल्या दुकानांमुळे लघू व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.