प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक 20 मार्च रोजी पंचायत समितीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये मोर्शी पंचायत समितीच्या सभापतिपदी वीणा प्रमोद बोबडे तर, उपसभापतिपदी सोनाली गजानन नवले यांची निवड करण्यात आली.

  • सभापतिपदी वीणा बोबडे, उपसभापतिपदी भाकपच्या सोनाली नवले

मोर्शी (Morshi).  येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक 20 मार्च रोजी पंचायत समितीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये मोर्शी पंचायत समितीच्या सभापतिपदी वीणा प्रमोद बोबडे तर, उपसभापतिपदी सोनाली गजानन नवले यांची निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वीणा बोबडे तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे भाऊ छापाने, सोनाली नवले व यादवराव चोपडे यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले होते. मात्र, यादवराव चोपडे यांनी नामांकन पत्र परत घेतले. त्यामुळे एकच नामाकंन असल्यामुळे सभापती पदासाठी वीणा बोबडे यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी भाऊराव छापाने व सोनाली नवले निवडणूक रिंगणात होते.

उपसभापतीच्या निवडणुकीत सोनाली नवले यांना 7 मते प्राप्त झाल्याने त्यांची उपसभापतिपदी वर्णी लागली. पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 10 सदस्य असलेल्या या पंचायत समितीत माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपाचे 6, शिवसेना 2 आणि काँग्रेस व भाकपाचे प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाच्या अंतर्गत करारानुसार विद्यमान सभापती यादवराव चोपडे आणि उपसभापती मायाताई वानखडे यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच संबंधितांकडे राजीनामा दिला. रिक्त झालेल्या या जागेचा पदभार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.

गुलाल उधळून आनंदोत्सव
या निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी काम पाहिले, तर नायब तहसीलदार गजानन चव्हाण व प्रफुल्ल पुनसे यांनी सहायक म्हणून काम पाहिले.