रक्तही उपयुक्त; त्यासाठी इतरांनीही रक्तदानासाठी पुढे आले पाहीजे- खासदार भावना गवळी

कोरोना रुग्णांना औषपधोपचारासह रक्तही अत्यावश्यक आहे.त्यासाठी इतरांनीही रक्तदान करुन रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन खा.भावना गवळी यांनी केले. 3 मे रोजी शिवसेनेच्या वतीने जनशिक्षण संस्था येथे आयोजित रक्तदान शिबिरात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

    वाशिम (Washim).  कोरोना रुग्णांना औषपधोपचारासह रक्तही अत्यावश्यक आहे.त्यासाठी इतरांनीही रक्तदान करुन रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन खा.भावना गवळी यांनी केले. 3 मे रोजी शिवसेनेच्या वतीने जनशिक्षण संस्था येथे आयोजित रक्तदान शिबिरात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

    कोरांना रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासन प्रशासन तितकेच तत्पर असले तरी देशासाठी काहीतरी केले पाहिजे त्यासाठी एक पाऊल रक्तदान करुन उचलावे ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे.

    रक्तपुरवठा आपल्याकडे असणे ही तेवढीच बाब महत्वाची असल्याने म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदानावर भर दिला आहे. त्या आवाहनानुसार कठीण प्रसंगातही समोर येवून 114 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात तुमचेही मोठे योगदान असल्याचे मत यावेळी खा. भावना गवळी यांनी व्यक्त केले. यावेळी 114 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण देशात व राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या रूग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची व प्लाझ्माची नितांत गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

    या रक्तदान शिबिराचे खा.भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी बोलताना खा.गवळी म्हणाल्या की,या शिबिराच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात शिवसेनेकडून एक मदतीचा हात म्हणून शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच जिल्हाभरामध्ये टप्याटप्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.जेणेकरून कोविडच्या रूग्णांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत होईल व युवकांना रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. रक्तदान शिबिरादरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली.

    यावेळी जिल्हा प्रमुख,उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख,उपशहर प्रमुख,उप तालुका प्रमुख,शाखा प्रमुख,जि.प.सदस्य,न.प.सदस्य,युवा सेनेच पदाधिकारी,महिला आघाडी यांनी मोठा सहभाग घेतला होता.यामध्ये डॉ.कोमल टापे, सचिन दंडे,शालीनी सावळे,संजू घोडे,लक्ष्मण काळे,अतीक शेख यांनी परिश्रम घेतले.या शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.