वाशीम जिल्ह्यात १६० कोरोनाबाधितांची नव्याने भर

जिल्ह्यात 160 कारोनाबाधित रुग्णांची भर पडली. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्याने 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास येथील 71 वर्षीय व्यक्तीचा 13 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने निर्बंध लावले आहेत.

    वाशीम (Washim).  जिल्ह्यात 160 कारोनाबाधित रुग्णांची भर पडली. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्याने 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास येथील 71 वर्षीय व्यक्तीचा 13 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. रुग्णसंख्या तसेच मृत्यू संख्या आटोक्यात राहावी यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    कॉन्टॅक्ट स्प्रेडर्सची तपासणी केली जात आहे. तसेच मास्क लावूनच घराबाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी फिरताना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवरही नजर ठेवली जात आहे. दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे. तसेच त्या दरम्यानच व्यवहार आटोपावे याकडेही लक्ष दिले जात आहे. परंतु तरीही काही महाभाग नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

    जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस विभागाचेही सर्व घडामोडीकडे लक्ष आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या काळजीचा विषय ठरत आहे. त्यामुळे ही संख्या आटोक्यात राहणे अत्यंत गरजेचे असून त्यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे.