९१ व्यावसायिकांची कोरोना तपासणी; व्यापाऱ्यांना २१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

तालुक्यातील भर जहागीर येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून व आरोग्य उपकेंद्राकडून तपासणी मोहीम राबवली जाते; परंतु कोरोनाचा एक रुग्ण निघाल्याने गावातील 91 व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. स्मिता बबेरवाल यांनी दिली.

    रिसोड (Resode).  तालुक्यातील भर जहागीर येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून व आरोग्य उपकेंद्राकडून तपासणी मोहीम राबवली जाते. परंतु कोरोनाचा एक रुग्ण निघाल्याने गावातील 91 व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. स्मिता बबेरवाल यांनी दिली.

    येथील किराणा, पिठाची गिरणी, हॉटेल, पानपट्टीधारक, कटलरी, रेडीमेड कापड दुकानदार, दूधडेअरीसह विविध व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानाची संख्या जवळपास शंभरच्या आसपास आहे. एकच प्रतिष्ठान तीन ते चार व्यक्ती चालवत असल्याने कुठल्याही एकाच व्यक्तीने कोरोना तपासणी करून चालणार नाही. ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये दवंडी फिरवून नोटिसद्वारे व्यापारी कुटुंबातील सदस्यांनी कोरोना तपासणी आवश्यक आसल्याचे सांगितले आहे.

    तपासणी मोहीम डॉ. अस्मिता बबेरवाल यांच्या नेतृत्वात आरोग्य सेविका अरूणा नालगे, आरोग्य सेविका कऱ्हाडे व आशा सेविकांच्या सहकार्याने घेण्यात आली. गावातील सर्व दुकानदार, विविध व्यापारी वर्गातील व्यक्तींनी कोरोना तपासणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करीत स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन भर जहागिरचे सरपंच पी. के. चोपडे यांनी केले आहे.