कोविड रुग्णांना २४ तास मिळेल मदत; मनसेने उभारले केंद्र

वाशिम जिल्ह्यात कोरोना आजाराची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गंभीर रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

    वाशिम (Washim).  जिल्ह्यात कोरोना आजाराची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गंभीर रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. येथील अकोला नाका परिसरातील न.प. संकुलातील राजगर्जना कार्यालयात कोविड रुग्ण मदत केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक राठोड यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी करण्यात आले.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, विधी सेनेचे अॅड. नामदेवराव जुमडे यांची उपस्थिती होती. या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना कोरोना टेस्टची माहिती, कोरोना रिपोर्टबाबत, रुग्णवाहिकेबाबत, रुग्णालयात वाढीव बिल किंवा चुकीचे असल्यास मदत, जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यत पोहचण्यासाठी मदत, औषध व उपचारासाठी सर्व कोविड सेंटरमधील बेडबाबत माहिती देण्यात येणार आहे.

    घरगुती जेवणाच्या डब्यासाठी संपर्क आदींची सर्व माहिती या मदत केंद्राद्वारे 24 तास पुरविण्यात येणार आहे. याकरिता 8308066907, 9763733897, 9834446919, 7841887202 हे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. गरजूंनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गजानन धोंगडे, महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे, किशोर गजरे, विजय नाईकवाडे, मोहन कोल्हे, मोहंमद नौरंगाबादी, बेबीताई धुळधुळे, विष्णू शिखरे, प्रतिक कांबळे, विक्की कलकोट, नितेश खडसे, मनोज राऊत, सतीश कडवे, मनिष महल्ले, मोहंमद चौधरी, फकीरा कर्डीले, सुहास जाधव, आकाश खाडे, वेदांत ढवळे, रवि गायकवाड, पोलीस राजुभाऊ बाविस्कर, गजानन पवार, वंजारे, श्रीकांत इंगोले, महेश कदम, विनोद सावके, विजू हेंबाडे, संदीप अवचार, संतोष पवार आदी उपस्थित होते.