In the car ministry, in the bungalow, the phone is not reachable; Where exactly did Minister Sanjay Rathore go?

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर मौन सोडले आहे. पोहरादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

    वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर मौन सोडले आहे. पोहरादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी घाणेरडं राजकारण सुरू असून एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हात जोडून केली.

    पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं असल्याचे ते म्हणाले. तसेच मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण असल्याचा आरोपही संजय राठोड यांनी केला.

    माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड म्हणाले.