विद्युत पुरवठा वारंवार होतोय खंडित; माजी नगरसेवक संतप्त

उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी शहरातील आजी, माजी नगरसेवकांच्या वतीने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

    रिसोड (Risod).  उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी शहरातील आजी, माजी नगरसेवकांच्या वतीने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

    निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. राज्यात इतरत्र कोठेही भारनियमन नसून फक्त रिसोड शहरात सुरू आहे. यामुळे शहरातील जनता वैतागली आहे. नियमित वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी गैरसोय होत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत लोडशेडिंग सुरू आहे.

    शहरवासीयांचा हा त्रास दूर करण्यासाठी लोडशेडिंग बंद करून शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी आजी, माजी नगरसेवकांनी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. ही समस्या निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.