प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात देशी दारूची अवैध विक्री सुरू आहे. वरकमाई करण्यासाठी सर्व नियम बाजूला सारून दारू विक्रेते ग्रामीण भागात होम डिलीवरी देत मोठ्या प्रमाणात अवैघ दारूची विक्री करत आहेत.

    वाशिम (Washim).  जिल्ह्यात ग्रामीण भागात देशी दारूची अवैध विक्री सुरू आहे. वरकमाई करण्यासाठी सर्व नियम बाजूला सारून दारू विक्रेते ग्रामीण भागात होम डिलीवरी देत मोठ्या प्रमाणात अवैघ दारूची विक्री करत आहेत. जिल्ह्यातील देशी दारू ही ग्रामीण भागाबरोबरच जिल्ह्याबाहेरील ग्रामीण भाग असलेल्या शेनगाव,लोणार तालुक्यापर्यंत पोचली आहे.या गंभीर प्रकाराकडे उत्पादनशुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आसल्याची चर्चा आहे.

    देशी दारू दुकानाला सुरु ठेवण्याची ठराविक वेळ असताना वेळ संपल्यानंतर दुचाकीने अवैधरित्या देशीदारू परीसरातील अनेक गावामध्ये राजरोसपणे पुरविली जाते. विशेष म्हणजे सदर देशी दारूची दुकाने भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेली व्यक्ती महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील असल्याने येथिल सर्वसामान्याच्या तक्रारीला काहीच जुमानत नाही.

    मागील एक वर्षांपासून अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे हातचे काम, व्यवसाय सुटल्याने अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनेकांना विवंचनेत टाकत आहे. सहजच देशी दारू कडे माणसे वळत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत ग्रामीण भागात होणारी अवैध दारू विक्री करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.