लॉकडाऊनची वाढली धास्ती; पेट्रोलपंप, किराणा दुकानात गर्दी

रिसोड तालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची चांगलीच धास्ती घेतली आहे. 9 मे रोजी शहरातील पेट्रोलपंप, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी गर्दी केली होती. पेट्रोलपंपवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस निरीक्षक एस.एम.जाधव यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला.

    रिसोड (Resode).  तालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची चांगलीच धास्ती घेतली आहे. 9 मे रोजी शहरातील पेट्रोलपंप, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी गर्दी केली होती. पेट्रोलपंपवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस निरीक्षक एस.एम.जाधव यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला.

    लॉकडाऊनच्या धास्तीने शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने कोरोना नियमाचे मात्र, तीनतेरा वाजले. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या आदेशानुसार 9 मे ते 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तालुक्यात धडकताच 9 मे रोजी सकाळी सात ते अकराच्या दरम्यान रिसोड शहरात लोकांनी एकच गर्दी केली. किराणा, भाजी, फळ दुकाने व पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या दरम्यान सोशल डिस्टन्स नियम उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

    ग्रामीण भागातील लोकांनी रिसोड शहराकडे धाव घेत आपली सर्व कामे सोडून गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. यावेळी पेट्रोल पंपावर तर खुपच गर्दी उसळली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी ठाणेदार एस.एम.जाधव यांनी सोशल डिस्टन्स नियम पालन करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचा छोटे व्यापारी व तसेच मजुरांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.