Maharashtra trembled; Girl raped in Gondia-Pune bus

गोंदिया-पुणे मार्गावर धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाझ होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही घटना म्हणजे दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनर्वृत्तीच म्हणावी लागले.

गोंदिया : गोंदिया-पुणे मार्गावर धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाझ होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही घटना म्हणजे दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनर्वृत्तीच म्हणावी लागले.

गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय. चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय.

आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकीही दिली होती.

६ जानेवारी रोजी ही घटना घडली. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिली. पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली. तसेच आरोपी समीर देवकर याला देखील पोलिसांनी अटक केलीय. मालेगाव पोलीस घटनेचा तपास करत आहेत.