ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने मीनाक्षी नागराळे सन्मानित

नागराळे यांनी आजपर्यंत स्टोरी मिररच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.अनेक पुस्तके बक्षिसही मिळाली आहेत. अनेक व्हॉव्हचर त्यांना मिळाले आहेत. त्यांचे साहित्य हजारो लोकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांनी लिखाणात वर्षभर सातत्य ठेवून भारतातून ’एडीटर चॉईस’ व लोकांनी दिलेल्या वोटींगमध्ये मराठी भाषेमधून दुसरे स्थान पटकावले आहे.

    वाशीम. स्टोरी मिरर या वेबसाईटवर लेखकाला हवे तसे कथा,कादंबरी,कविता,कोट्स असे लिखाण करण्यासाठी एक मुक्त अशी हक्काची जागा आहे. या वेबसाईटवर वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथील जि.प.शाळेच्या आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी 2020 या वर्षात या साईटवर अनेक कथा, कविता, कोटस मराठी भाषेमधून लिहिलेल्या आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्टोरी मिरर तर्फे त्यांना बेस्ट ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

    नागराळे यांनी आजपर्यंत स्टोरी मिररच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.अनेक पुस्तके बक्षिसही मिळाली आहेत. अनेक व्हॉव्हचर त्यांना मिळाले आहेत. त्यांचे साहित्य हजारो लोकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांनी लिखाणात वर्षभर सातत्य ठेवून भारतातून ’एडीटर चॉईस’ व लोकांनी दिलेल्या वोटींगमध्ये मराठी भाषेमधून दुसरे स्थान पटकावले आहे. स्टोरी मिरर या वेबसाईटवरून प्रमाणपत्र व ट्रॉफी पोस्टाने पाठवून मिनाक्षी नागराळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
    मिनाक्षी नागराळे या तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका आहेत. शाळेत त्या अनेक उपक्रम राबवित असतात. लॉकडाऊन काळातही त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जि.प.शाळा कोकलगाव या शाळेचा कायापालट केला. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतो. स्टोरी मिररचा भारतातला मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मान नागराळे यांना मिळाल्यामुळे सर्व साहित्यिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.