आमदार पाटणींनी खेचून आणला १ कोटींचा विकासनिधी; मूलभूत सुविधांचा करणार विकास

ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी याच्या प्रयत्नांनी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

    कारंजा (Karanja).  ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी याच्या प्रयत्नांनी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

    कारंजा तालुक्यातील लोहारा येथे मरीमाय मंदिर ते मोहळ रस्ता बांधकामासाठी 10 लाख रुपये, जयपूर येथे ग्रा.प. इमारतीच्या वर सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये, धामणी खडी येथे अवधूत महाराज मंदिर परिसरात सभामंडपासाठी 10 लाख रुपये, वडगाव इजारा येथे भोले शंकर मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे 10 लाख रुपये, कामरगाव येथे रणजीत घोडसाळ यांचे दुकान ते जयस्तंभ चौक सिमेंट रस्ता करणे 10 लाख रुपये, मानोरा तालुक्यातील जनूना येथे सभागृहाला वॉलकपाउंड सौंदर्यीकरण करणे 10 लाख रुपये, अजनी येथे बाबाराव ठाकरे ते ज्ञानेश्वर चिपडे, जगन पाटील ते चित्रा व्यवहारे, सुधाकर चिपडे ते सरडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 10 लाख रुपये, विठोली येथे महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी 10 लाख रुपये, खंडाळा येथे पारधी तांडा येथे समामंडप बांधकाम 10 लाख रुपये, वसंतनगर येथे तांडावस्तीमधील सभामंडपाला वॉलकपाउंड साठी 10 लाख रुपये आदि विकास कामांचा समावेश आहे.