संजय राठोड, शिवसेनेचे आमदार
संजय राठोड, शिवसेनेचे आमदार

वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आधीच जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने येथे मंगळवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये 50 पेक्षा अधिक लोकं जमता कामा नये, असे आदेशच पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे राठोड यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  वाशीम (Washim).  वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आधीच जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने येथे मंगळवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये 50 पेक्षा अधिक लोकं जमता कामा नये, असे आदेशच पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे राठोड यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  बंजारा समाजाचा पाठिंबा, शक्तीप्रदर्शन करणार
  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट आरोप केल्यानंतर पंधरा दिवसानंतर पहिल्यांदाच राठोड सार्वजनिक ठिकाणी येणार आहेत. मंगळवारी ते पोहरादेवी येथे येऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर पोहरादेवीवर जमण्याची शक्यता आहे. या निमित्ताने राठोड यांच्याकडूनही शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे. या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना जमा होऊ देऊ नये, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती वाशीमचे पोलिस अधीक्षक वसंत परदेश यांनी दिली.

  ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल
  बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्यासाठी राठोड समर्थकांनी तयारी सुरू केली आहे. मंगळवारी पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या कार्यकर्त्यांचा मानस आहे. व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर राठोड समर्थकांकडून मंगळवारी सकाळी 11 वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राठोड यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे.

  अन्यथा समाजाचे नुकसान होईल, अशा आशयाचे मेसेज सध्या विविध ग्रुप्सवर व्हायरल करण्यात आले आहेत. संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन त्यातून करण्यात आले आहे. एका व्यक्तीने किमान 10 जणांना सोबत घेऊन राठोड यांच्या स्वागताला उपस्थित रहावे, असा उल्लेख मेसेजमध्ये आहे. त्यामुळे पोहरादेवीत राठोड शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.