डाक सेवक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लॉकडाऊन काळात कोविड रुग्णांना पोहचविली औषधे

कोरोना महामारीच्या काळात अकोला व वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवकांनी पार्सलच्या माध्यमातून औषध पोहोचण्याचे काम केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार लिंक खातेदारांना बोटाचा ठसा घेऊन कोट्यवधी रुपयांचे वितरण केले.

    जऊळका रेल्वे (Jaulka Railway).  कोरोना महामारीच्या काळात अकोला व वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवकांनी पार्सलच्या माध्यमातून औषध पोहोचण्याचे काम केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार लिंक खातेदारांना बोटाचा ठसा घेऊन कोट्यवधी रुपयांचे वितरण केले. याच डाकसेवकांना कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

    मागील वर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना महामारीने चांगलाच गोंधळ घातला होता. लॉकडाऊनच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर अकोला व वाशीम विभागातील विभागीय कर्मचारी व ग्रामीण डाक सेवकांसह जवळपास एक हजार कर्मचारी कार्यतत्पर होते. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना प्रशासनाकडून लस देण्यास सुरुवात झाली.

    परंतु धोका पत्करून काम करणाऱ्या कर्मचारी व ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही लस देण्यात आली नाही. शासनाने त्वरित विभागीय कर्मचारी व डाकसेवकांना लस द्यावी अशी मागणी होत आहे.