प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मानोरा (येथे सध्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू, हरभरा, भूईमूग, ज्वारी ही पिके आहेत. त्याचप्रमाणे फळबाग लागवडही केली आहे. उन्हाचा तडाखा असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे.

    मानोरा (Manora).  सध्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू, हरभरा, भूईमूग, ज्वारी ही पिके आहेत. त्याचप्रमाणे फळबाग लागवडही केली आहे. उन्हाचा तडाखा असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे; मात्र वीजवितरण कंपनीने वीज देयक थकित असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, एका ट्रांसफॉर्मरवर अंदाजे 10 कनेक्शन असतील तर 10 शेतकऱ्यांनी वीज देयक भरले पाहिजे असे बंधन घातले आहे. मात्र, जे शेतकरी वीज देयक भरायला तयार आहेत. त्यांचेही कनेक्शन कापले जात आहेत, हा अन्याय आहे. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यात पठाणी वसुली वीजवितरण कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

    त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. काही दिवस सवलत देऊन त्यांना सूट द्यावी, अन्यथा प्रहार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शाम पवार, ओम बालोदे, प्रतीक संजय ठाकरे, हितेश राठोड, नितेश लवटे, युवराज राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.