विधानपरिषद सदस्य आणि आमदार अमोल मिटकरी
विधानपरिषद सदस्य आणि आमदार अमोल मिटकरी

मालेगाव (Malegaon). सद्यस्थितीत देशात मंदिची लाट असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आजच्या पिढीने उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. ते मालेगांव येथील एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर कार्य करीत आलेला पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत भविष्य घडवावे असे आवाहन आ. मिटकरी यांनी केले.

याप्रसंगी माणिकराव मापारी, महादेवराव मापारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, दामुअण्णा इंगोले, विशाल बोरे, डॉ. निलेश वानखेडे, संजय दहात्रे, वसंतराव अवचार, भरत आव्हाळे, नागेश कव्हर, सुभाष बोरकर, प्रा.अरविंद गाभणे, प्रशांत गोळे, विजय महाले, सेवाराम आडे, विठ्ठल भागवत, प्रा आंनद देवळे, प्रा. मधुसूदन तोष्णीवाल, चंद्रकांत गायकवाड, दत्तात्रय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. मिटकरी पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे आजघडीला देश आर्थिक मंदिच्या संक्रमणातून जात असल्याने अर्थकारण बिघडले. परिणामी, कोट्यवधींचे रोजगार हिरावल्या गेलेले महानगरातून गावी परतले आहेत.

या संकटकाळात नोकरीच्या अपेक्षेवर न राहता तरुणांनी उद्योग, व्यवसायाची कास धरण्याची गरज आहे. काळाचे पाऊल ओळखून ज्ञानेश्वर इंगोले व भागवत मापारी यांनी योग्य निर्णय घेतला. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना औषधी घेणे परवडत नसल्याने अल्पदरात जेनेरीक औषधी तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांना याचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू शेगर, लखन इंगोले, शुभम टिंगरे यांनी सहकार्य केले.