प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या मागणीची दखल घेत येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. या लसीकरणाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरंपच शेख जमिरभाई यांनी केले आहे.

    मेडशी (Medashi).  येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या मागणीची दखल घेत येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. या लसीकरणाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरंपच शेख जमिरभाई यांनी केले आहे.

    येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आतापर्यंत 13 जणांना कोरोना लस देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी निलेश जामकर यांनी दिली. मेडशी येथे आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत 19 गावे येतात. तरी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी 45 वर्षावरील व्यक्तींनी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच शेख जमीरभाई यांनी केले आहे. तर वैद्यकीय अधिकारी निलेश जामकर यांनी 45 वर्षाच्या वरील व्यक्तींनी लसीकरण घेण्याकरिता आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये यावे, सोबत आधारकार्ड किंवा इलेक्शन कार्ड आणावा, पोटभर जेवण करून पुरेशी विश्रांती घेऊन आल्यास लस घेणे सोपे होते.

    कोणताही दुर्धर आजार असला तरी, त्याच्यावर लसीचा दुष्परिणाम होत नाही. अशी माहिती देत कोणत्याही अपप्रचाराला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी निलेश जामकर यांनी केले आहे.