प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वाशीम जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व खाजगी आस्थापनाधारकांनी 11 मार्च ते 21 मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

    वाशीम (Washim). जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व खाजगी आस्थापनाधारकांनी 11 मार्च ते 21 मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आता 25 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 25 मार्चपर्यंत चाचणी न केल्यास 26 मार्चपासून संबंधितांना आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

    भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट लॉज यासह इतर सर्व खाजगी आस्थापनांमध्ये काम करणा-या कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे. कोरोना चाचणी केली नसल्यास त्यांनी 25 मार्चपर्यंत करुन घ्यावी.

    वाशीम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व तुळजा भवानी मंगल कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपी, कामरगाव व अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड (ता. रिसोड) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह आणि जिल्ह्यातील सर्व 25 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.