प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसींचा तुटवडा

ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना लसीकरण गावात व्हावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपेकेंद्र तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रावर कोरोना लसीकरण करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले होते. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत लसीकरणाचे काम करत असतानाच आता काही प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

    वाशिम (Washim).  ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना लसीकरण गावात व्हावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपेकेंद्र तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रावर कोरोना लसीकरण करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले होते. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत लसीकरणाचे काम करत असतानाच आता काही प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामाला ब्रेक मिळत असल्याचा प्रकार ग्रामीण भागात दिसून येत आहे.

    तालुक्यातील किन्हीराजा, शिरपूर, जऊळका रेल्वे या प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून आतापर्यन्त 11 हजार 101लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे; परंतु 7 एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा,जऊळका आदी ठिकाणची लस संपली असल्याची माहिती हाती आली असून मेडशी,व शिरपूर येथील लस ही दोन दिवसात संपुष्ठात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या मालेगाव तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे दिसून येत आहे.

    मालेगांव तालुक्यात किन्हीराजा,मेडशी, शिरपूर,जऊळका रेल्वे व मालेगाव आदी ठिकाणी ग्रामीण रुग्णालये कार्यान्वित आहेत.कोरोनाची फैलाव रोखण्यासाठी सर्वच प्रा आरोग्य केंद्रात कोरोना लसीचे डोज दिल्या जात आहे.मालेगाव तालुक्यात लसीकरण मोहीम योग्यरीत्या सुरू असताना 7 एप्रिल रोजी तालुक्यातील काही ठिकाणची लसीकरणाचा साठा संपला होता.परिणामी किन्हीराजा येथे लसीकरण करणे बंद झाले होते.लस संपल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच प्रत जावे लागले.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.

    लसीचा तुटवडा जाणवत असून लसीचा तुटवडा जानवत असून याबाबत माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. एक ते दोन दिवसात कोरोना लसी उपलब्ध होतील. -- डॉ. संतोष बोरेसे, आरोग्य अधिकारी, मालेगाव तालुका