साहेब आम्ही जगायचं कसं? सलून व्यावसायिकांचा राज्यकर्त्यांना सवाल

रिसोड (Resode). कोरोना संसर्गजन्य साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून लॉकडाऊन केले आहे.परिणामी रोजगार गेला असून जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत करावी किंवा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी ...

    रिसोड (Resode).  कोरोना संसर्गजन्य साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून लॉकडाऊन केले आहे.परिणामी रोजगार गेला असून जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत करावी किंवा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील सलून व्यावसायिकांनी प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

    लॉकडॉऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-यांना बसला आहे. नवीन नियमावलीत सलून,ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या व्यवसायात काम करणारे व्यावसायिक आधीच आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत काम केल्यावर रात्रीच्या जेवणाची शास्वती मिळते. एक दिवस जरी काम बंद असेल तर,त्यांच्या समोर उपजिविकेचा प्रश्न उपस्थित होतो.

    आता तर 6 ते 30 एप्रिल पर्यंत एक महिना दुकाने बंद राहणार आहेत. बंदची धास्ती घेत सलून व्यावसायिकांची झोप उडाली आहे. शहरातील व्यावसायिकांनी प्रशासनामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे. आम्ही जगायचं कस? असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्यवसायाची परवानगी द्या, अन्यथा आमच्या खात्यावर दरमहा दहा हजार रुपये किंवा प्रतिदिन 500 रु. जमा करून मदत करा अशी मागणी केली आहे.