Storm crowd to Sanjay Rathore's show of strength Who is responsible if the corona infection increases?
प्रातिनिधीक फोटो

राज्यात पून्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला आहे. विदर्भात तर कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या आवहनाला हरताळ फासले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे.

    वाशिम : राज्यात पून्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला आहे. विदर्भात तर कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या आवहनाला हरताळ फासले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे.

    एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत. हा गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

    संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे हजारोच्या संख्यने गर्दी झाली होती. जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, विदर्भात कोरोनाचा स्फोट झाला असून, अमरावतीमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. तर, वर्धा यवतमाळमध्ये देखील कडक निर्बंध जारी करण्यात आलेत. असे असताना सर्व नियम पायदळी तुडवत संजय राऊत समर्थकांनी याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.