प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वाशीम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बियर बार, दारू दुकानांमध्ये आता एकूण बैठक क्षमतेच्या २५ टक्के ग्राहकांनाच बसण्याची मुभा राहील.

    वाशीम (Washim).  कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बियर बार, दारू दुकानांमध्ये आता एकूण बैठक क्षमतेच्या २५ टक्के ग्राहकांनाच बसण्याची मुभा राहील. या नियमाचे उल्लंघन केल्यास बियर बार, दारू दुकाने बंद करण्यात येतील.

    याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांच्यावर पीएसआय दर्जाचे अधिकारी गुन्हे दाखल करू शकणार आहेत. अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.