वाशिम जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या अडीच हजारांवर

जिल्ह्यात जानेवारीनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी, याची पुरेपूर अंमलबजावणी झाली नाही. तसेच नागरिकही कोरोनाबाबत गंभीर नसल्याने कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

  • ३२३ नवे संक्रमित
  • १३५४६ जणांना सुटी

वाशीम. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजारांवर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2 हजार 663 आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी चिंताजनक बनत चालली असून आतापर्यंत या ससंर्गजन्य आजाराने आजापर्यंत 188 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात जानेवारीनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी, याची पुरेपूर अंमलबजावणी झाली नाही. तसेच नागरिकही कोरोनाबाबत गंभीर नसल्याने कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात नागरिकांची बेपर्वाई कोरोनाला आमंत्रण देणारी ठरली असून नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दरदिवशी कोरोनाची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 398 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यातील 13 हजार 546 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 663 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 188 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 323 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जिल्ह्याबाहेरील 10 बाधिताची नोंद झाली असून 278 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.