लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ; घरात बसून पोटाची खळगी भरण्याची चिंता

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व गरीबांचे अर्थचक्र थांबले असून यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्यांना दैनंदिन जगण्यासाठी सुविधा व अत्यावश्य साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

    मालेगाव (Malegaon).  लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व गरीबांचे अर्थचक्र थांबले असून यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्यांना दैनंदिन जगण्यासाठी सुविधा व अत्यावश्य साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

    लॉकडाऊन असल्यामुळे हातात पैसा येत नाही. परिणामी दररोज लागणारे दूध, किराणा, भाजीपाला, फळे, कडधान्य खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नाही घरात बसून पोटाची खळगी भरता येत नाही. हातावर पोट असलेल्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागते. मात्र हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा,असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बंद ठेऊन व्यवसायातील कामगार बेरोजगार झाल्याने व्यावसायिक व मजूर वर्गाचे हाल होत आहेत. गोरगरीबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

    लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यावसायिकांबरोबरच मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. — राम मोहळे, व्यापारी मालेगाव.