दोन ट्रक आमोरासमोर धडकले ; एक ठार

मालेगाव,
आयशर-ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर क्लिनरसह ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील जवळील रेल्वे गावानजीक काल मंगळवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. तुकाराम धोंडीबा बारबैलन (वय 28) रा. गंगापूर जि. औरंगाबाद असे मृतकाचे नाव आहे.
 
 
औरंगाबाद येथून एमएच 20 ईएल 6519 क्रमांकाचा आयशर भाजीपाला घेऊन अमरावतीकडे जात होता तर एमएच 27 बीएक्स 1949 क्रमांकाचा ट्रक अमरावती येथून मुंबईकडे जात होता. दरम्यान जऊळका गावानजीक 7 जुलैच्या रात्री 11.30 वाजता दरम्यान एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनाची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये आयशर चालक तुकाराम बारबैल रा. गंगापूर जहॉगीर (शेंद्रा एमआयडीसी) ता. गंगापूर जि. औरंगाबाद याचा जागीच मृत्यू झाला तर आयशरचा क्लिनर व ट्रकचा चालक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधव, पोलिस उपनिरीक्षक पंडीत हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वाशीम येथे सरकारी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या अपघातामुळे नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.