बाप्पाच्या नैवेद्यासाठी अर्पण करा ‘हे’ पदार्थ

गणपतीला पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. 

बेसनाचे लाडूदेखील तुम्ही अर्पण करु शकता.

मोतीचूर लाडू हा नात्यातला गोडवा वाढवणारा पदार्थ मानला जातो. हा देखील नैवेद्यासाठीचा उत्तम पर्याय आहे.

रव्याची खीरदेखील नैवेद्यासाठी बनवू शकता.

घरात काही बनवता येत नसेल तर केळ्यांचा किंवा इतर फळांचा नैवेद्य दाखवू शकता.

मखाण्याची खीर हा एक वेगळा गोड पदार्थही तुम्ही ट्राय करू शकता.

गणपतीला पंचमेवा म्हणजेच पाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही अर्पण करू शकता.

गुळ- खोबरं किंवा नारळाची बर्फीदेखील नैवेद्याला वापरू शकता.

कलाकंद किंवा इतर मिठाईदेखील बाप्पाला नैवेद्यासाठी अर्पण करता येते.

 मालपुआदेखील नैवेद्यासाठीचा चांगला ऑप्शन आहे.