सातारा -कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणार फाटा आहे. तिथे उजवीकडे वळलं की एक रस्ता चाफळला जातो. इथे राम मंदिर आणि त्या मंदिरासमोर दास मारूती आहे.

चाफळच्या राम मंदिरामागे 100 मीटरवर  आणखी एक मारूतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली. यात मारूतीचा रुद्रावतार बघायला मिळतो.

चाफळपासून एक किलोमीटरवर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे मारूतीच्या मूर्तीची स्थापना रामदासांनी केली.

चाफळपासून 3 किलोमीटरवर गावरक्षक पाषाणाला समर्थांनी मारूतीचं रूप दिलं. द्रोणागिरी पर्वत नेणारा हनुमान या मूर्तीमध्ये दिसतो. माजगावचा मारूती अशी याची ओळख आहे.

उंब्रजमध्ये असलेल्या तीन मारूतींपैकी हा एक मठातील मारूती.

उंब्रजपासून 10 किलोमीटर अंतरावर समर्थांनी पूर्वाभिमुख मारूतीची स्थापना केली. मसूरच्या मारूतीची ही मूर्ती खूप सुंदर आहे.

सांगली जिल्ह्यात शिराळे गाव सापांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र इथे एक मारूतीचं मंदिर आहे . शिराळ्याच्या मारूतीची मूर्ती इथे आहे.

मसूरपासून 3 किलोमीटरवर शहापूर गावचा फाटा आहे. इथेच  एक किलोमीटरवर शहापूरचा मारूती आहे.

सांगली जिल्ह्यातील बहे बोरगावच्या मारूतीचीही  स्थापन समर्थांनी केलेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मनपाडळेचा मारूती आहे. पन्हाळगड- ज्योतिबाच्या परिसरात हे मंदिर आहे.

पारगावचा मारूती बाल मारूती म्हणूनही ओळखला जातो. याला समर्थांच्या झोळीतील मारूती असंही म्हणतात.