Lambretta Elettra S इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय आहे खास? रेंजपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Automobile

07 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Lambretta ने EICMA 2026 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Elettra S सादर केली आहे. या स्कूटरमध्ये एका चार्जमध्ये 119 किमीपर्यंत रेंज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.

119 किमीची रेंज!

Picture Credit:pinterest

या स्कूटरमध्ये जुन्या Lambretta मॉडेलची झलक पाहायला मिळते. फिक्स्ड फ्रंट मडगार्ड, आयताकृती हेडलॅम्प आणि आकर्षक बॉडी डिझाइन यामुळे तिला खास रेट्रो लूक मिळतो.

रेट्रो लूक अन् मॉडर्न डिझाइन

Picture Credit:pinterest

Lambretta Elettra S मध्ये PMSM इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 3kW कंटिन्युअस आणि 5kW पीक पॉवर जनरेट करते. स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.

दमदार इलेक्ट्रिक मोटर

Picture Credit:pinterest

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 72V क्षमतेचा 4.5kWh NMC बॅटरी पॅक मिळतो. Eco मोडमध्ये ही स्कूटर 119 किमीपर्यंत प्रवास करू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

4.5kWh बॅटरी पॅक

Picture Credit:pinterest

रायडिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी यात तीन मोड्स दिले आहेत. – Eco Mode – रेंजला प्राधान्य – Normal Mode – रोजच्या वापरासाठी – Sport Mode – अधिक स्पोर्टी रायडिंग अनुभव

तीन रायडिंग मोड्स

Picture Credit:pinterest

ही स्कूटर घरातील सामान्य इलेक्ट्रिक सॉकेटवर चार्ज करता येते. 800W चार्जिंग पॉवरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास 14 मिनिटे लागतात.

चार्जिंगसाठी किती वेळ?

Picture Credit:pinterest

या स्कूटरमध्ये 12 इंचांची चाके देण्यात आली आहेत. पुढील बाजूला डबल शॉक अ‍ॅब्जॉर्बरसह Trailing Link Suspension मिळते. तर मागील बाजूला हॉरिझॉन्टल मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे.

खास सस्पेन्शन सेटअप

Picture Credit:pinterest

आधुनिक फीचर्समध्ये मोठा TFT डिस्प्ले आणि Full LED लाइटिंगचा समावेश आहे. जुन्या Lambretta च्या डिझाइनसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ यात पाहायला मिळतो.

TFT डिस्प्ले अन् LED लाइट्स

Picture Credit:pinterest

Elettra S चे उत्पादन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मात्र, भारतातील लॉन्च, किंमत आणि विक्रीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भारतीय बाजारात ही स्कूटर कधी येणार, याकडे लक्ष लागले आहे.

भारतात कधी येणार?

Picture Credit:pinterest