12th Fail हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. विधु विनोद चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

चित्रपटाची कथा यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची आहे. जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते.

हा सिनेमा मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित असून, मनोज सध्या आयपीएस अधिकारी आहे.

ट्रेलरची सुरुवात चंबळमधील एका गावातून होते, मनोज म्हणजेच विक्रांत यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला येतो

मनोजचे कुटुंब आर्थिक संकटातून जात आहे, तर मनोज त्याच्या तयारीसाठी शौचालय साफ करून चार रुपये कमावतो.

विक्रांत मेसीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ट्रेलरला प्रेक्षक चांगल्या कमेंट्स देत आहेत.

अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर सिनेमाची कथा आधारित आहे.

27 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होत असून मल्याळम, तामिळ, तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे.