रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच जगातील सगळ्यात महाग कार लॉन्च केली आहे.
या कारचं नाव La Rose Noire Drop Tail असं आहे.
'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेल या कारची किंमत 30 मिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.
30 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार कारची किंमत 250 कोटी रुपये इतकी आहे.
'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेल कारचे फक्त चारच मॉडेल तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही एक दुर्मिळ कार आहे.
ही कार रोल्स रॉयसने 1930 सालातील एका यॉट पाहून डिझाइन केली आहे. यात 1600 लाकडाचे तुकडे आणि अनेक खास गोष्टी वापरल्या आहेत.
दोन वर्ष या कारचं काम सुरु होतं.याची इंजिनची क्षमता 601hp असून यामधून 840 एनएम टॉर्क तयार होतो. या कारमध्ये ट्वी-टर्बोचार्ज्ड 6.75 लिटर व्ही 12 इंजिन आहे.
या कारमधलं रिमुव्हेबल रुफ कार्बन फायबरपासून तयार केलेलं आहे. एका क्लिकवर हे रुफ सेट करता येतं किंवा रिमूव्ह करता येतं.