जितेंद्र आव्हाड आणि वाद हे काही नवीन नाही. आव्हाड वादांमुळं नेहमी चर्चेत असतात, औरंगजेबचे समर्थन केल्यामुळं मागे त्यांच्यावर चांगलीच टिका झाली होती

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण केली होती, तेव्हा देखील आव्हाड वादात सापडले होते

ठाण्यात एका उद्घाटन कार्यक्रमात एका महिलेचा विनयभंग केला म्हणून आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

आव्हाड पक्ष्याव्यतिरिक्त स्वत:ची मतं, भूमिका मांडत असतात, म्हणून ते सतत चर्चेत असतात

आता आव्हाडांनी एका समाजाची बदनामी केल्यावरुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय

आव्हाडांना जरी पक्षाचा पाठिंबा असला तरी, रोखठोक भूमिकेमुळं व वादामुळं ते सतत चर्चेत असल्यानं पक्षाची देखील काहीवेळा कोंडी होते