स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 8 प्रकारची योगासने खूप उपयुक्त आहेत.
शीर्षासन केल्याने मेंदूत रक्त प्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती वाढते.
सर्वांगासन केल्यामुळे मेंदूत रक्तप्रवाह वाढतो. यामुळे लक्ष केंद्रित होते आणि स्मरणशक्ती सुधारते. मात्र हे आसन तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करा.
वृक्षासन जितकं शारीरिक संतुलनासाठी उपयुक्त आहे तितकंच ते एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
भ्रामरी प्राणायाम हा ताण कमी करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे नाक, कान, मेंदू, डोळे या अवयवांच्या पेशींना चालना मिळते.
पद्मासन हे एकाग्रता आणि स्मरणशक्ती दोन्हीसाठी उपयोगी आहे.
मत्स्यासन हे मेंदूच्या स्मृती केंद्रांना उत्तेजित करण्यासाठी तसेच मान आणि खांदे दुखीवर उपयोगी आहे.
नाडी शोधनामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि स्मरणशक्तीदेखील वाढते.
पश्चिमोत्तानासन हे आसन ताण कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करावं.