मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी करावी ‘ही’ योगासने
योगासनांमुळे अनेक आजारांवर मात करता येते. मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणती योगासने करावी, हे जाणून घेऊयात.
अधोमुख श्वानासन या आसनामुळे मेंदुला रक्त पुरवठा वाढतो आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.
सेतुबंधासन या आसनामुळे मनातल्या चिंता कमी होतात. त्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.
शवासनामुळे शरीरातल्या स्नायूंचा ताण कमी होत
ो.
त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो.
पश्चिमोत्तानासनामध्येशरीराच्या खालच्या भागातले स्नायू ताणले जातात त्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.
उत्तानासान हे आसन निगेटीव्ह विचारांशी लढण्याची ताकद देणारं आहे.
मार्जरासनामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराच्या वरच्या भागातला ताण कमी होतो.
बालासनामुळे मेंदूला शांती मिळते. तणावापासून मुक्ती मिळते.
विपरित करणी योग केल्याने रक्ताभिसरण सुधारतं. डिप्रेशन आणि झोप न येण्याचा त्रास कमी होतो. डोकेदुखी कमी होते.