झाकणे ठेवण्यासाठी आता शोधावी लागणार नाही जागा! काय आहे Pot Lid Organizer?

Science Technology

03 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हा एक खास स्टोरेज रॅक आहे. यामध्ये वेगवेगळ्या आकारांची झाकणे स्वतंत्रपणे ठेवता येतात.

काय आहे Pot Lid Organizer?

Picture Credit:pinterest

काही मॉडेल्समध्ये अॅडजस्टेबल डिव्हायडर्स असतात. त्यामुळे लहान-मोठ्या झाकणांसाठी जागा बदलता येते.

आकारानुसार बदलता येते!

Picture Credit:pinterest

झाकणे एकावर एक रचण्याऐवजी उभी ठेवता येतात. त्यामुळे गरजेचे झाकण शोधणे सोपे होते.

उभ्या पद्धतीने स्टोरेज

Picture Credit:pinterest

काही डिझाइन्स कपाटाच्या दरवाजाला किंवा भिंतीला बसवता येतात. यामुळे किचनमधील उपलब्ध जागेचा वापर करता येतो.

कपाटातही बसवता येते!

Picture Credit:pinterest

प्लास्टिक, स्टेनलेस स्टील आणि मेटल अशा विविध प्रकारांमध्ये हे ऑर्गनायझर मिळते.

वेगवेगळ्या मटेरियलमध्ये उपलब्ध

Picture Credit:pinterest

प्रत्येक झाकणासाठी स्वतंत्र जागा असल्याने ती शोधताना होणारी धावपळ कमी होते. किचनही अधिक नीटनेटके दिसते.

झाकणांचा गोंधळ कमी

Picture Credit:pinterest

झाकणांचा आकार, रॅकची क्षमता, कपाटातील उपलब्ध जागा आणि मटेरियलची गुणवत्ता तपासा. बसवण्याची पद्धतही लक्षात घ्या.

खरेदी करताना काय पाहाल?

Picture Credit:pinterest

किचनमधील झाकणांचा पसारा कमी करून स्टोरेज अधिक व्यवस्थित ठेवायचे असेल, तर Pot Lid Organizer उपयोगी ठरू शकतो.

छोट्या गॅजेटमुळे मोठी सोय!

Picture Credit:pinterest