बॉलीवूडच्या टॉप हेअरड्रेसरने धोनीला दिला नवा लूक

Photo Credit- aalimhakim/instagram

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी नेहमी हटके गोष्टी करत असतो.

सध्या तो त्याच्या हटके हेअरकटमुळे चर्चेत आला आहे.

धोनीच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूडचा टॉप हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने धोनीला हा नवा लूक दिला आहे.

आलिम हकीमने धोनीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काळा चष्मा, काळा टी शर्ट आणि वेगळी हेअरस्टाईल असा धोनीचा लूक या फोटोमध्ये आहे.

या हेअरस्टाईलचा फोटो जेव्हा धोनीने आलिमला दाखवला होता तेव्हा आलिमने त्याला थोडे केस वाढवायला लागतील, असं सांगितलं. त्यानंतर केस वाढवून हा हेअरकट करण्यात आला.

माहीच्या लांब केसांचा फॅन असल्याने नवी हेअरस्टाईल करताना मजा आल्याचं आलिम सांगतो.

नव्या हेअरस्टाईलमुळे धोनी हँडसम दिसतोय.