अभिज्ञा भावेच्या घरी बाप्पासाठी अक्कलकोटचा देखावा
अभिनेत्री अभिज्ञा भावेने घरच्या गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिज्ञाच्या घरी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या रुपात बाप्पा विराजमान झाले आहेत.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचा देखावा तिने बाप्पासाठी घरी तयार करवून घेतला आहे.
‘श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया…अशक्य ही शक्य करतील स्वामी’, असं कॅप्शन देत तिने गणपतीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिज्ञाने तिचा नवरा मेहुल पैसोबत बाप्पाच्या स्वामीरुपी मूर्तीची पूजा केली.
तिच्या घरची बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर दिसतेय.
अभिज्ञा भावे संपूर्ण कुटुंबासोबत गणपतीचा सण साजरा करतेय.
अभिज्ञा आणि मेहुलने शेअर केलेल्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.