प्रभासने ‘या’ कारणासाठी घेतलाय कामातून ब्रेक
प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला होता.
प्रभास सध्या ‘Kalki 2898 AD’, ‘सालार’, व्हिंटेज किंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.या चित्रपटांचीही सध्या खूप चर्चा सुरु आहे.
मात्र आता प्रभासने कामातून ब्रेक घेतल्याची माहिती मिळाली आहे.
कारण सध्या प्रभास गुडघेदुखीमुळे त्रस्त आहे.
गुडघेदुखीचा त्रास वाढल्यामुळे प्रभासने गुडघ्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतलाय.
सर्जरीनंतर गुडघा नीट झाल्यानंतरच प्रभास पुन्हा चित्रपटाच्या कामाला सुरुवात करेल.
मात्र प्रभासच्या सर्जरीबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.
प्रभासच्या गुडघेदुखीच्या त्रासाबद्दल समजल्यानंतर त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करतायत.