'मुलगी झाली हो' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर. 

अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या 'विठ्ठल माझा सोबती' असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे.

'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटात विठ्ठलावर श्रद्धा असलेल्या मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.

संदीप नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

‘या चित्रपटाच्या रूपाने वारीचा सोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

विठ्ठल तुम्हाला संकटातून कसा तारून नेतो हे चित्रपटात दाखवण्यात आल्याचं दिव्या म्हणाली.

भक्ताच्या आयुष्यात विठ्ठल आल्यावर काय घडतं हे चित्रपटात पाहता येईल.

या चित्रपटासाठी दिव्या खूप उत्सुक आहे.

दिव्याचा नवा चित्रपट 23 जूनला प्रदर्शित होणार आहे.