टॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत पूजा हेगडेची क्रेझ, इतक्या कोटींची आहे संपत्ती
टॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पूजा हेगडेचा आज वाढदिवस आहे.
अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पूजा 2010 मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सेकंड रनरअप होती.
पूजाने आपल्या करियरची सुरुवात ‘मूगामूडू’ पासून केली. तिचा 2012 ला रिलीज झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला.
पूजाने खूप कमी कालावधीमध्ये करोडोंची संपत्ती कमवली आहे.
लाइफस्टाइल एशियाच्या मते पूजाकडे 51 कोटींची संपत्ती आहे.
पूजाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत चित्रपट आणि जाहिराती आहेत.
पूजा एका चित्रपटासाठी साधारण 3 ते 4 कोटी रुपये घेते.ब्रँड एंडॉर्समेंटसाठी ती साधारण 40 लाख घेते.
पूजाला लक्झरी गाड्यांची आवड आहे. तिच्याकडे 2 कोटींची पोर्शे केयेन, 60 लाखांची जगुआर आणि 80 लाख रुपयांची ऑडी क्यू-7 कार आहे.
तिने वांद्र्याला सी-फेसिंग 3BHK अपार्टमेंट विकत घेतलेलं असून त्याची किंमत 6 कोटी आहे. तसेच तिचं हैदराबादला 4 कोटींचं घर आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर पूजा आता ‘हाउसफुल 5 ’मध्ये झळकणार आहे.