मराठमोळा साज अन् सायली संजीवचा वेगळाच बाज
Photo Credit - sayali_sanjeev_official/instagram
सध्या नवरात्रीनिमित्त अनेक अभिनेत्री ट्रॅडिशनल लूकमधले फोटो शेअर करत आहेत.
अभिनेत्री सायली संजीवनेही पारंपरिक लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तिने पिवळ्या नऊवारी साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिचा मरोठमोळा साज पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिने कुंदन आणि मण्यांचा चोकर, बिंदी आणि अंगठी या साडीसोबत घातली आहे.
सायलीच्या लूकचं आणि तिच्या स्माईलचं खूप कौतुक होत आहे.
तिच्या फोटोवर एकाने ‘तू चंचला..तू कामिनी..मनामनांत तुझीच मोहिनी’, अशी कमेंट केली आहे.
सायलीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.