Published Mar 16, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
अभिनेत्री टीना दत्ता 'उतरन' या टीव्ही शोच्या माध्यमातून घराघरात प्रसिद्ध झाली
तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.
'टीव्हीची संस्कारी सून' म्हणून ओळखली जाणारी टीना दत्ता सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
टीनाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम पिंक कलरची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने केसात गजरा माळून लूकला साजेसा मेकअप जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत.
टीना दत्ताने साडीतल्या लूकवर गळ्यात गोल्डन नेकलेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
टीना दत्ता गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्ट्समध्ये दिसलेली नाही.
अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.