अधिक मासातील एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकदाशी म्हणतात
ही एकादशी दर तीन वर्षांनी येते.
इच्छापूर्तीसाठी कमला एकादशीचे व्रत करावे असे म्हटले जाते.
या व्रतामुळे यश आणि कीर्ती वाढते, कामाचं कौतुक होतं अशी श्रद्धा आहे.
विष्णुच्या कृपेने पापं नष्ट होतात, वैकुंठात स्थान मिळते असं मानलं जातं.
निपुत्रिक असणाऱ्यांना हे व्रत करायला सांगितले जाते.
कृतीवीर्य राजाच्या राणीने हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती झाल्याची आख्यायिका सांगितली जाते
यंदा 28 जुलै दुपारी 2.51 मिनिटांपासून 29 जुलै दुपारी 1.05 मिनिटांपर्यंत एकादशी आहे.