अधिकमासात काही गोष्टींचं दान नक्की करावं. 

अधिकमासाच्या दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा या तिथींना दान करण्याचं महत्त्व आहे.

अनारसे,बत्तासे,रेवड्या,सप्तधान्य अधिकमासात दान केलं जातं.

दान शक्यतो तांब्याच्या पात्रात करावे. तांब्याच्या ताम्हणात पत्रावळी ठेवाव्या

या पत्रावळींवर गहू ठेवून दान करायच्या वस्तू त्यावर ठेवाव्यात

या ताम्हणावर वस्त्र झाकून ठेवावे त्यावर तुपाचा दिवा लावावा. 

दान देणाऱ्या व्यक्तीचं पूजन करावं, दान करण्यात येणाऱ्या वस्तूंवर दक्षिणा ठेवावी.

अधिकमासात आईची खणा-नारळानं ओटी भरायची प्रथा आहे.

जोडवी, सौभाग्याच्या वस्तू, अलंकार अधिक मासात भर घालून वाढवाव्यात.

 कृष्णाला न चुकता तुळस वाहावी, लोण्याचा नैवेद्य दाखवावा, ते लहान बाळाला द्यावे.