18 जुलैपासून अधिकमास सुरू होत आहे, ते थेट 16 ऑगस्टला हा अधिकमास संपणार आहे.
हा अधिकमास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो, यावेळी विष्णुची उपासना केली जाते.
या महिन्यात धार्मिक कार्य आणि पूजा करणं शुभं मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात तुळशीशी संबंधित उपाय केल्यास खूप फायदा होतो.
विष्णुला तुळस प्रिय आहे आणि या महिन्यात श्री हरीची पूजा करावी.
चला जाणून घेऊया अधिकमासात तुळशीशी संबंधित कोणते उपाय करावेत.
विष्णुला दाखवण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीचा वापर करावा.
तुळशीची पूजा करताना प्रदक्षिणा नक्की घालावी.
मनोभावे तुळशीची पूजा करावी, तिला लाल वस्त्र अर्पण करावे
रोज तुळशीला जल अर्पण करावे आणि नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा.