आदिपुरुष सिनेमात श्री राम आणि सीता यांची कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

सिनेमात हनुमान रामायणाची गोष्ट सांगणार असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे.

3 मिनिटे 19 सेकंदांच्या या ट्रेलरमधून आदिपुरुषमधील प्रभू रामाची कथा त्यांना वनवासाला जावं लागल्यापासून दाखवण्यात आली आहे. 

ट्रेलर पाहताच चाहत्यांनी आदिपुरुषला ब्लॉकबस्टर म्हटले आहे. चित्रपटात अमेझिंग व्हीएफएक्स पाहायला मिळणार आहे.

आदिपुरुषमध्ये प्रभासने श्री रामाची भूमिका केली आहे, कृती सेननने सीतेची आणि सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका केली आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शन केले आहे. 

आदिपुरुषाचे बजेट 700 कोटी असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाला एक खास फील देण्यासाठी तंत्रज्ञानावर खूप पैसा खर्च केल्याचे त्याच्या ट्रेलरवरूनच दिसते.

 16 जूनला रिलीज होणाऱ्या या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. 

सीतेच्या अपहरणाचे दृश्य ट्रेलरमध्ये खूपच उठून दिसले.

आदिपुरुष मधील जय श्री राम ट्यून मनोज मुंतशिर यांनी लिहिली आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. सुमारे 20 गायकांनी मिळून ते गायले आहे.