मारुती आणि टाटा यांनी यापूर्वी वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या आणि आता त्या पाठोपाठ अजून एक कंपनी आपल्या गाड्यांचे दर वाढवत आहे.
नवरात्री आणि दिवाळीसाठी नवीन गाडी घरी आणण्याचा विचार करणाऱ्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.
Picture Credit:pinterest
स्कोडा ऑटो इंडियानेही दरवाढीची घोषणा केली असून येत्या १ ऑक्टोबर पासून हे दर लागू होणार आहेत.
Picture Credit:pinterest
वाहनांच्या किमतीत जास्तीत जास्त १.२ टक्क्यांनी वाढ केली जाईल. कंपनीच्या मते, ही वाढ मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल.
Picture Credit:pinterest
कोणत्याही मॉडेल किंवा व्हेरिएंटची किंमत जास्तीत जास्त केवळ २० हजार ने वाढवली जाईल.
Picture Credit:pinterest
यामुळे महागडी मॉडेल्स खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल.
Picture Credit:pinterest
उत्पादन खर्च वाढ आणि वाहन उद्योगातील कच्च्या मालाच्या किमीत झालेली वाढ.
Picture Credit:pinterest
स्टील, अॅल्युमिनियम आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या पुरवठा साखळीतील बदलांमुळे वाहन उत्पादकांवरील आर्थिक दबाव वाढत आहे.
Picture Credit:pinterest
कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्कोडा कायलाक, मिड-साईज एसयूव्ही स्कोडा कुशाक आणि सेडान स्कोडा स्लाव्हिया, स्कोडा ऑक्टोव्हिया आरएस आणि स्कोडा सुपर यांसारख्या प्रिमियम सेगमेंटमधील वाहनांचाही समावेश आहे.
Picture Credit:pinterest