Photo Credit-lulumoonowlbooks/instagram

AI च्या मदतीने फळांना मिळालंय सोफ्याचं रूप ?

AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तयार केले जातात.

वेगवेगळ्या नेत्यांचे, अभिनेत्यांचे AI ने तयार केलेले वेगवेगळ्या अवतारातले फोटो तुम्ही पाहिले असतील. 

मात्र आता AI च्या मदतीने फळांना वेगळं रुप देण्यात आलं आहे.

AI च्या मदतीने फळांच्या आकाराच्या खुर्च्या/ सोफा तयार करण्यात आल्या आहेत.

lulumoonowlbooks या इन्स्टाग्राम पेजवर फळांच्या खुर्च्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

अनेकांनी फळांच्या आकाराच्या खुर्च्यांचे फोटो तयार करण्याच्या संकल्पनेचं कौतुक केलं आहे.

सगळ्याच फळांच्या खुर्च्या सुंदर दिसत आहेत.

या खुर्च्या/ सोफा खूप आरामदायी दिसत आहेत.

डोळ्याचं पारणं फेडणारे हे फोटो आहेत.

या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.