घरातील प्रदूषण रोखायचंय? Air Purifier आणि Air Quality Monitor मधला फरक जाणून घ्या!

Science Technology

09 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Air Purifier हे घरातील हवा स्वच्छ करणारे गॅजेट आहे. यामध्ये असलेले फिल्टर हवेतील धूळ, परागकण आणि इतर सूक्ष्म कण कमी करण्यास मदत करतात.

काय आहे Air Purifier?

Picture Credit:pinterest

हे उपकरण खोलीतील हवा आत खेचते. HEPA फिल्टरच्या मदतीने हवेतील अनेक सूक्ष्म कण अडकवते आणि फिल्टर केलेली हवा पुन्हा खोलीत सोडते.

कसे काम करते Air Purifier?

Picture Credit:pinterest

Air Quality Monitor हे हवेची गुणवत्ता मोजणारे उपकरण आहे. याच्या मदतीने घरातील PM2.5, PM10, तापमान आणि आर्द्रता यांसारख्या गोष्टींची माहिती मिळू शकते. काही मॉडेल्स CO2 आणि VOCs देखील मोजतात.

काय आहे Air Quality Monitor?

Picture Credit:pinterest

यामध्ये सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स हवेतील प्रदूषकांचे प्रमाण मोजतात. त्यानंतर स्क्रीन किंवा मोबाइल ॲपवर Air Quality ची माहिती दाखवली जाते.

कसे काम करते Air Quality Monitor?

Picture Credit:pinterest

Air Purifier हवेतील प्रदूषक कण फिल्टर करून कमी करतो, तर Air Quality Monitor हवेतील प्रदूषणाची पातळी मोजतो. एक हवा स्वच्छ करण्यासाठी, तर दुसरे हवेची स्थिती समजण्यासाठी उपयोगी आहे.

दोघांमधील मुख्य फरक काय?

Picture Credit:pinterest

घरात धूळ, धूर, परागकण किंवा PM2.5 चा त्रास असेल तर योग्य क्षमतेचा HEPA Air Purifier उपयोगी ठरू शकतो. मात्र हवेची गुणवत्ता तपासायची असेल तर Air Quality Monitor निवडा.

घरासाठी कोणतं गॅजेट महत्त्वाचं?

Picture Credit:pinterest

होय! Air Quality Monitor मुळे घरातील हवेतील प्रदूषणाची पातळी समजते, तर Air Purifier हवेतील कण कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे दोन्ही उपकरणांचा एकत्र वापर फायदेशीर ठरू शकतो.

दोन्ही गॅजेट्स एकत्र वापरता येतात का?

Picture Credit:pinterest

Air Purifier घेताना HEPA फिल्टर, CADR आणि खोलीचा आकार तपासा. Air Quality Monitor घेताना PM2.5, PM10 आणि आवश्यकतेनुसार CO2 किंवा VOC सेन्सर्स आहेत का ते पाहा. लक्षात ठेवा, कोणतेही एक उपकरण सर्व प्रकारचे प्रदूषण दूर किंवा मोजू शकत नाही.

खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?

Picture Credit:pinterest